गोंदिया,दि.06ः-रामनगर पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या कुडवा येथे पत्नीला बेदम मारहाण करुन ठार करणार्या पती मनोज सावरकर(वय 35)विरुध्द तक्रार दाखल झाली असून पोलीस तपास करीत आहेत.मृतक सुमन सावरकर या महिलेचा भाऊ विकास वैद्य याने हुंड्यासाठी बहिणीला त्रास देण्यात येत असल्याचे म्हटले असून 5 मार्चच्या रात्री डोक्यावर,पाठीवर मारहाण केल्याचेही म्हटले आहे.पती मनोज सावरकरला ताब्यात घेण्यात आले आहे.