31.3 C
Gondiā
Friday, June 19, 2026
Home शैक्षणिक जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्यावतीने राज भगतचा सत्कार

जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्यावतीने राज भगतचा सत्कार

0
121

गोंदिया,दि.06ः- जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदियाच्यावतीने घेण्यात आलेल्या गणित विषय प्रज्ञा शोध परिक्षेत जिल्ह्यात व्दितीय आलेल्या भारतरत्न अटलबिहारी बाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा हिरडामाली येथील इ.चौथीचा राज खुमेंद्रकुमार भगतचा डायटच्यावतीने सत्कार करण्यात आला.
प्रशस्तिपत्र,स्मृतिचिन्ह ,नवोदय अभ्यास पुस्तिका व पुष्पगुच्छ देऊन राजला पुरस्कृत करण्यात आले.
या प्रसंगी डायट चे प्राचार्य राजकुमार रूद्रकार ,वर्गशिक्षिका कु.साधना पारधी व शिक्षण विभागाचे अधिकारी व त्याचे पालक उपस्थित होते. राजने आपल्या यशाचे श्रेय वर्ग शिक्षिका कु.साधना पारधी यांना दिले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष राखीलाल येळे,मुख्याध्यापिका नाननबाई बिसेन ,उपाध्यक्ष महेश कुंभलकर,समीती सदस्य उपसरपंच तेजलाल पटले,शा.व्य.समीती सदस्य प्रा.लोकेश कटरे,दशरथ पटले,चंद्रसेन पटले,सविता बिसेन,वंदना ठाकूर,संगिता मसराम,नंदेश्वरा राऊत,दिपकला बिसेन,उषा राऊत,प्रतिमा घरडे,पदविधर शिक्षक सुरेश बघेले,सौ.छायाताई पारधी,ए.डी.तितिरमारे,वीरेंद्रकुमार पटले,क्रांतीलाल पटले यांनी केले.