नागपूर,दि.16 : आखाडा बाळापुर पोलीस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या डोंगरकडा पोलीस चौकी अंतर्गत येत असलेल्या हिवरा येथे दिनांक 13 मार्च 2020 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरांनी चार घरांची घरफोडी करुन सोने-चांदी, रोखरक्कम सहित 59 हजाराच्या वर ऐवज लंपास केल्याने आखाडा बाळापुर आणि डोंगरकडा पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, डोंगरकडा पोलीस चौकी अंतर्गत येत असलेल्या हिवरा येथे दिनांक 13 मार्च 2020 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी भाऊराव पांचाळ, अंकुश कल्याणकर, गोविंद नघोरे, मारोती मोरे यांच्या घरांचीदारे तोडून भाऊराव पांचाळ यांच्या घरातील सोने चांदी आणि नगदी पाच हजार रुपये असा मिळून ऐकून 49,000 हजार रुपये चा ऐवज चोरून नेला तर अंकुश कल्याणकर यांच्या घरातील नगदी दहा हजार रुपये चोरून नेले तर उर्वरित दोघांच्या घरी चोरट्यांना काहीही मिळाले नाही असे तेथील चोरी पीडितांनी सांगितले