मध्य प्रदेशमध्ये ‘कमलनाथ’ सरकारची आज शक्तिपरीक्षा

0
891

भोपाळ(वृत्तसंस्था)दि.16 – मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार सोमवारी विधानसभेत बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहे. तत्पूर्वी रविवारी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही गोटांत जोरदार हालचाली सुरू होत्या. दरम्यान, जयपूर येथे थांबलेले ८५ काँग्रेस आमदार भोपाळला परतले. दुसरीकडे दिल्लीत भाजप नेत्यांच्या बैठका सुरू असून सकाळी केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या निवासस्थानी ज्योतिरादित्य शिंदे, शिवराजसिंह चौहान आणि धर्मेंद्र प्रधान यांनी चर्चा केली. शिवराजसिंह यांनी गुरुग्राममध्ये हॉटेलमध्ये थांबलेल्या १०५ आमदारांची भेट घेतली.

ज्योतिरादित्य शिंदे समर्थक आमदारांनी संरक्षण मागितले

ज्योतिरादित्य शिंदे समर्थक आमदारांनी आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत संरक्षण मागितले आहे, तर भाजपने बहुमत चाचणीसाठी आपल्या आमदारांना व्हीप जारी केला आहे.