Home शैक्षणिक १९१ शिक्षकांची वेतनवाढ पूर्ववत

१९१ शिक्षकांची वेतनवाढ पूर्ववत

0

गोरेगाव ,दि.१७ –:तालुक्यातील १९१ शिक्षकांनी २00९-१0 या वर्षात प्रवास रजा सवलत घेतली होती. पण यावर पीआरसीने आक्षेप नोंदविल्याने त्या १९१ शिक्षकांवर कारवाई करत त्यांची एका वर्षासाठी वेतनवाढ थांबविली होती. या प्रकरणात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने वेतनवाढ पूर्ववत करण्याबाबत वेळोवेळी संबंधित विभागाशी चर्चा करून मागणी करण्यात आली होती. यावर शुक्रवारी जि.प. गोंदियाने त्या १९१ शिक्षकांची वेतनवाढ पूर्ववत करण्याचे पंचायत समितीला आदेश दिले. सदर प्रकरणात शिक्षक संघाच्या वतीने खंडविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे व गटशिक्षणाधिकारी यशवंत कावळे यांच्यासोबत चर्चा करून वेतनवाढ त्वरित करण्याची मागणी करण्यात आली होती. शिष्टमंडळात केंद्रप्रमुख जी.जे. बिसेन, तालुका संयोजक शंकर चव्हाण, ए.डी. पठाण, एफ.एम. बिसेन, पी.आय. गौंधर्य, वाय.बी. पटले, पोमेश येळे, चैतराम कायलारे, एन.के. बिसेन, डब्ल्यू.एच. रहांगडाले, व्ही.आर. रहांगडाले, पी.झेड. पटले, अंगद कुंडगीर, एफ.जे. प् ाठाण, राहुल कळंबे, रमेश बिसेन, डी.डी. बिसेन उपस्थित होते

Exit mobile version