Home शैक्षणिक राजीव गांधी आयटीआयमध्ये सुविधांचा अभाव; एमएचटी-सीईटी परीक्षा केंद्र रद्द करण्याची मागणी

राजीव गांधी आयटीआयमध्ये सुविधांचा अभाव; एमएचटी-सीईटी परीक्षा केंद्र रद्द करण्याची मागणी

0

केंद्रावरील गैरसोय उजागार, तासोनतास परीक्षार्थी तत्काळत

गोंदिया,दि.२५ : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व (MHT-CET exam) कृषि तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी २४ एप्रिल रोजी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. राजीव गांधी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तिरोडा (ITI Tiroda) येथे परीक्षा केंद्र असल्याने जिल्हाभरातून परीक्षार्थी केंद्रावर पोहोचले. पण केंद्रावरील असुविधेने परीक्षार्थ्यांना चांगलीच गैरसोय सहन करावा लागली. तर (Power supply) विज पुरवठा खंडीत झाल्याने परीक्षाच थांबविण्यात आली. विशेष म्हणजे, केंद्रावर असलेले जनरेटरचीही सोय नसल्याचे पालकांनी सांगितले.तर बाहेरुन आलेल्या पालकांना व परिक्षार्थ्यांकरीता पिण्याच्या पाण्याची सोय सुध्दा करण्यात आलेली नव्हती.सदर आयटीआयचे निरिक्षण केल्यावर सदर आयटीआय हे परीक्षा केंद्राकरीता निकष पुर्ण करीत नसतांनी त्या केंद्राची शिफारस करुन परीक्षार्थी विद्यार्थी व पालकांचा छळ जिल्हा प्रशासनाने व राज्यसरकारने केल्याचा आरोप पालकांनी केला.त्यातच आज २५ एप्रिल रोजी काही पालकांनी जिल्हाधिकारी यांचे नावे निवेदन सादर करीत सदर आयटीआयची तपासणी करुन तेथील परीक्षा केंद्र तत्काळ रद्द करण्याची तसेच सुविधांचा अभाव असतानाही परीक्षा केंद्र देणार्या अधिकार्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (MHT-CET exam) अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषि तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी २०२४ ही प्रवेश परीक्षा ऑनलाईन पध्दतीने जिल्ह्यांमध्ये २२ एप्रिल ते ३० एप्रिल व २ मे ते १७ मे २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा सकाळी ७.३० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत प्रथम सत्रात आणि दुपारी १२.३० ते सायंकाळी ६.४५ या वेळेत द्वितीय सत्रात घेण्यात येणार आहे. यासाठी (ITI Tiroda) राजीव गांधी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तिरोडा, शासकीय तंत्रनिकेतन गोरेगाव रोड फुलचूरपेठ गोंदिया व महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी खमारी येथे केंद्र देण्यात आले आहे.

राजीव गांधी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तिरोडा (ITI Tiroda) येथे ऐन परीक्षाच्या दिवशी गोंधळ उडाला. परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रावरील असुविधेने अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ऐन परीक्षा सुरू असताना विज पुरवठा खंडीत झाल्याने परीक्षाच खोळंबली. दरम्यान केंद्रावर असलेले जनरेटरही आधीपासूनच निकामी झालेले होते. त्यामुळे परिक्षार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला. दरम्यान परीक्षा सुरू असताना अचानक विज पुरवठा खंडीत पडल्याने परीक्षार्थी गोंधळात सापडले. सकाळी १०.१५ वाजतापासून बंद असलेला (Power supply) विज पुरवठा दुपारी १२.३० वाजता सुरळीत झाला. परिणामी विद्यार्थ्यांना तत्काळत रहावे लागले. यानंतर जवळपास दोन ते अडीच तासानंतर पुन्हा परीक्षेला सुरूवात झाली. या प्रकाराने परीक्षेचा अवधी चांगलाच लांबला होता. विशेष म्हणजे, पर्यायी व्यवस्था करण्यास केंद्राला अपयश आल्याने नियोजनशुन्य कारभार उजागर झाला. यामुळे परिक्षार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.

२८२ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
एमएचटी-सीईटीची परीक्षा (MHT-CET exam) होती. यासाठी राजीव गांधी औद्योगिक प्रशिक्षण संस्था केंद्रावर (ITI Tiroda) देवरी,भरनोली,ककोडी,अर्जुनी मोरगावपासून दूरवरून आलेल्या परिक्षार्थ्यांनी पहाटेपासून गर्दी केली होती. दरम्यान प्रथम सत्रात १५० पैकी १३९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते तर ११ परिक्षार्थी अनुपस्थित राहिले. त्याचप्रमाणे दुसर्‍या सत्रात १५० पैकी १४३ परिक्षार्थी हजर राहिले तर ७ अनुपस्थित राहिले. विशेष म्हणजे पहिल्या सत्राच्या परीक्षेसाठी सकाळी ८ वाजता केंद्रावर प्रवेश देण्यात आला.

वादळाने विज पुरवठा खंडीत
काल, सायंकाळी आलेल्या वादळाने परिसरातील अनेक विजेचे खांब (Power supply) आणि वाहिन्या क्षतिग्रस्त झाल्याने देखभाल व दुरूस्तीमुळे विज पुरवठा खंडीत झाला होता. परंतु, याचा फटका परिक्षार्थ्यांना सोसावा लागला.

Exit mobile version