अर्जुनी-मोर,दि.17ः जिल्हास्तरीय रंग तरंग स्पर्धेत पी. डी. विद्यालय ऐरंडी /महागाव येथील सागर देवेंद्र भजने वर्ग 12 कर्णबधिर या दिव्यांग विद्यार्थ्याने कोरोना व उपाय योजना या विषयावर चित्र काढून जिल्ह्यात व्दितीय क्रमांक पटकावला.तसेच पावसाळा या विषयावर श्यामाप्रसाद विद्यालय महागाव येथील धीरज रामदास कोल्हे वर्ग 6 कर्णबधिर याने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.जि.प. व. प्राथमिक शाळा माहुरकुडा येथील सोहम महेश डोंगरे वर्ग 3 रा प्रवर्ग सी.पी.या विध्यार्थ्यांने तालुक्यात दुसरा क्रमांक पटकावला.श्यामा प्रसाद विद्यालय महागाव येथील कु. निखिता पुरुषोत्तम आष्टीकर वर्ग 9 प्रवर्ग सी. पी. या विधार्थीनीला केंद्रातून दुसरा तसेच तालुक्यातुन प्रोत्साहन म्हुणुन 3 रा क्रमांक देण्यात आले. या सर्व विदयार्थ्यांचे केंद्रप्रमुख बी.एन.बोरकर, शाळेचे मुख्याध्यापक, व शिक्षक व केंद्राच्या संसाधन शिक्षिका कु. आर एस. मानकर यांनी विदयार्थ्यांंच्या घरी प्रत्यक्ष भेट घेऊन विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले.