अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती नोंदणीत जिल्हा राज्यात अव्वल,तर इन्स्पायर अवार्डमध्ये राज्यात 4 था

0
297

गोंदीया,दि.22ः-राज्यात कोविड 19 मूळे सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती जरी असली तरी गोंदिया जिल्ह्यातील शिक्षण विभागाने ऑनलाइन कामात राज्यात उत्तुंग भरारी घेतली आहे.सर्वत्र ऑनलाइन कामाचा व्याप वाढलेला असून कोविड 19 मुळे ऑनलाइन कामाची मागणी वाढलेली आहे.यात अल्पसंख्याक शिष्यवृत्तीचे (रिनीवल) काम पूर्ण करण्यात राज्यात अव्वल तसेच inspire award ची नोंदणी करण्यामध्ये राज्यात 4 था आणि विदर्भात प्रथम येण्याचा मान गोंदिया जिल्ह्याने मिळविलेला आहे.

गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कच्छवे व प्राथमिकचे प्रभारी शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांचे मार्गदर्शनात समग्र शिक्षा विभागाने हे काम केले आहे.जिल्हास्तरावरील समग्र शिक्षा कार्यक्रम कर्मचारी, तालुकास्तरावरील MIS समन्वयक व डेटा एन्ट्री ऑपरेटरच्या श्रमाला यश मिळाले आहे.

गोंदिया येथील जिल्हा समन्वयक नितेश खंडेलवाल, तालुकास्तरावर कार्यरत MIS-Coordinator सुशील खापर्डे(आमगाव), श्रीकांत त्रिपाठी (गोंदिया), कु. शीतल कुम्भलवर (गोरेगाव), कु. स्वाती भोयर (सालेकसा), Data Entry Opertaor कैलास खोब्रागडे (गोंदिया), संजय मेश्राम( देवरी), आशा मासरकर (तिरोडा), कल्पना रहांगडाले(गोरेगाव), यांनी अल्पसंख्याक शिष्यवृत्ती (रीनेवल) चे काम वेळेत पूर्ण करण्यात सतत परिश्रम घेतल्यानेच जिल्हा राज्यात अव्वल येऊ शकला. यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, शिक्षणाधिकारी (माध्य.) प्रफुल्ल कच्छवे आणि राजकुमार हिवारे शिक्षणाधिकारी(प्राथ.) यांनी सर्व ऑनलाईन कार्य करणाऱ्या समग्र शिक्षा कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.