इंडस टॉवर्सचे गोंदियाजवळील डोंगरगाव येथे मोबाइल टॉवर उभारण्यासाठी सूद चॅरीटी फाऊंडेशनसोबत सहकार्य

0
42

, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण सहज उपलब्ध करून देणार

बहुतांश विद्यार्थयांसह  4500 रहिवाशांना इंटरनेट कनेक्टिव्हीटी  मिळवून देणार

गोंदिया,दि.30-: देशभरात कम्युनिकेशन उपलब्ध करून देण्याची आपली बांधिलकी जपत इंडस टॉवर्सने सूद चॅरीटी फाऊंडेशनसोबत सहकार्य करून महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया शहराजवळील डोंगरगाव येथे मोबाइल टॉवर उभारला आहे. यामुळे या भागात कनेक्टिव्हीटी अगदी सहज उपलब्ध होईल. नागपूरपासून अवघ्या 150 किमी. अंतरावर असूनही टॉवर नसल्याने या भागात इंटरनेट कनेक्टिव्हीटी अगदीच कमी आहे. गोंदियाशहराजवळीलरहिवाशांनि सोशल मिडियावर समाजसेवकांना विनंती करत या भागातील नेटवर्क सुधारण्यात सहाय्य मागितले होते. इथे विद्यार्थ्यांना सध्या त्यांचे ऑनलाइन क्लासेसकरणे शक्य होत नाहीए.

डोंगरगावातील या नव्या टॉवरमुळे दोन गावांना आणि 4500 हून अधिक लोकांना फायदा होणार आहे. या गावातील 60 टक्के ग्रामस्थ शेतकरी आहेत आणि ऑनलाइन शिक्षणावर अवलंबून असण्याऱ्याविद्यार्थ्यांची संख्याही प्रचंड आहे.

उभारणीचे काम पूर्ण झाल्याबद्दल सोनू सूद फाऊंडेशनचे संस्थापक आणि समाजसेवक सोनू सूद म्हणाले, “ऑनलाइन शिक्षण ही नवी पद्धत रूढ झाली आहे. मात्र, इंटरनेट नसल्याने या विद्यार्थयांना हे शक्य होत नाही हे माझ्या लक्षात आणून दिल्यानंतर माझे मित्र करण गिलहोत्रा यांच्यासोबत मी इंडस टॉवर्सला भेटून यावर काय उपाय करता येईल, हे पाहिले. महिन्याभराच्या आत इथे नवा टॉवर उभा राहिला आणि इंटरनेट नसणं ही बाब भूतकाळ ठरली. आता इथल्या शेकडो मुलांना त्यांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी अविरत कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे.”

इंडस टॉवर्सचे महाराष्ट्र आणि गोव्याचे सीसीईओ दिनेश अरोरा म्हणाले,”मोबाइल टॉवर्स हा टेलिकॉम क्षेत्रातील फार महत्त्वाचा भाग आहे आणि भारतातील दुर्गम भागातही उत्कृष्ट शैक्षणिक अनुभव देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. डोंगरगाव येथे मोबाइल टॉवर उभारून ग्रामस्थांसाठी नेटवर्क कव्हरेज सुधारण्यासाठी सूद चॅररटी फाऊंडेशनसोबत सहकार्य करताना इंडस टॉवर्सला अभिमान वाटतोय. येथील स्थानिक समुदायाचे प्रयत्न आणि सूद चॅरीटी फाऊंडेशनचा मानवतावादी सहभाग यामुळेच या नव्या टॉवरची यंत्रणा सुरू करणे शक्य झाले. या नव्या टॉवरमुळे या भागातील नेटवर्क सुधारेल. त्यामुळेविद्यार्थ्यांनात्यांच्या घरातील सुरक्षित वातावरणातून सहज ऑनलाइन क्लासेस करता येतील आणि ग्रामस्थांनाही सहजसोपी मोबाइल कनेक्टिव्हि मिळेल. यापुढेही, देशभरात कम्युनिकेशन उपलब्ध करून देण्याच्या आमच्या उद्दीष्टानुसार आम्ही सातत्याने दमदार आणि परिणामकारक टेलिकॉम सुविधा उभारत राहू.”

उभारणीचे काम पूर्ण झाल्याबद्दल सोनू सूद फाऊंडेशनचे संस्थापक आणि समाजसेवक सोनू सूद म्हणाले,”ऑनलाइन शिक्षण ही नवी पद्धत रूढ झाली आहे. मात्र, इंटरनेट नसल्याने या विद्यार्थयांना हे शक्य होत नाही हे माझ्या लक्षात आणून दिल्यानंतर माझे मित्र करण गिलहोत्रा यांच्यासोबत मी इंडस टॉवर्सला भेटून यावर काय उपाय करता येईल, हे पाहिले. महिन्याभराच्या आत इथे नवा टॉवर उभा राहिला आणि इंटरनेट नसणं ही बाब भूतकाळ ठरली. आता इथल्या शेकडो मुलांना त्यांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी अविरत कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे.”

सोनू सूद फाऊंडेशनसोबतचे हे असे दुसरे सहकार्य आहे. मागील वर्षि पंजाब आणि हरियाणा सार्कलमध्ये इंडस टॉवर्सने हरियाणातील मोरनी हिल्स येथे टॉवर उभारून या भागातील विद्यार्थयांसाठी ऑनलाइन शिक्षण शक्य करून दिले होते.