
तिरोडा : राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) १४ जून रोजी नीट यूजी २०२५ चा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालात तिरोडा तालुक्यातील खमारी येथील कु. साक्षी पारेंद्रकुमार रहांगडाले या विद्यार्थिनीने १००० रॅकिंग प्राप्त करीत यश संपादन केले आहे. या कामगिरीमुळे ती जिल्ह्यातून प्रथम ठरली आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण असणारी नीट यूजी परीक्षेचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. जिल्ह्यातून जवळपास ३५च्यावर विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश संपादन केले. निकालात खमारी येथील पारेंद्रकुमार रहांगडाले व सौ. ठानेश्वरी रहांगडाले यांची सुकन्या कु. साक्षी पारेंद्रकुमार राहांगडाले हिने नीट परीक्षेत ७२० पैकी ६०० गुण घेऊन ऑल इंडिया रॅकिंगमध्ये १००० रैंक प्राप्त करीत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. साक्षीच्या यशाबद्दल तिचे अभिनंदन केले जात आहे.