सुरकुंडी येथील निवासी शाळेची प्रवेश प्रक्रिया सुरू

0
26

वाशिम, दि. ०६ ) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने वाशिम तालुक्यात सुरकुंडी येथे चालविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेत शैक्षणिक सत्र सन २०२१-२२ या वर्षाकरीता मुलींना वर्ग ६ वी ते १० वी पर्यंतच्या सेमी इंग्रजी माध्यमांकरीता प्रवेश प्रक्रिया २० मे २०२१ पासून सुरु झाली आहे.

निवासी शाळेत प्रवेशित जागांसाठी अनुसूचित जाती ८० टक्के, अनुसूचित जमाती १० टक्के,व्हीजेएनटीसाठी ५ टक्के, विशेष मागास प्रवर्गासाठी २ टक्के आणि दिव्यांगासाठी ३ टक्के याप्रमाणे आरक्षण राहील. प्रवेशासाठी शाळेचे मुख्याध्यापक ए.आर. भगत (भ्रमणध्वनी क्र. ९९२३७०३०५९) यांचेशी संपर्क साधावा.