Home शैक्षणिक हिराटोल्यातील मुकूल बोपचेची भारतीय नौदलात निवड

हिराटोल्यातील मुकूल बोपचेची भारतीय नौदलात निवड

0

गोंदिया,दि.10ः- जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील हिराटाेला या छोट्याश्या गावातील मुकूल देवेंद्र बोपचे या विद्यार्थ्याची वयाच्या 19 व्या वर्षी भारतीय नौदलात SSR officer या पदावर निवड झाल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.निवड होणारा गोरेगांव तालुक्यातून एकमेव विद्यार्थी असून सध्या भुवनेश्वर (ओरीसा ) येथे प्रशिक्षण घेत आहे.मुकूलचे शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले असून मोठा भाऊ श्रीकांत हा अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षाला आहे.मुकूलला लहानपणापासूनच देशसेवेबद्दल जिव्हाळा असल्याने नौदलाकडे आकर्षित झाला.मुकूलचे वडील हे स्थानिक कृषी महाविद्यालयात कार्यरत असून आजोबा सेवानिवृत्त वनअधिकारी आहेत.आजी अमृताबाई व आई मंजुबाई बोपचे गृहीणी आहेत. मुकूलच्या यशाचे अभिनंदन सर्वाकडुन अभिनंदन होत असून मुकुलने यशाचे श्रेय परिवार,नातेवाईकांना व गोल्स ऑकडमी गोरेगांवचे संचालक शुभम मेश्राम,मनोज बोपचे,डॉ.प्रकाश पटले,आर.जे.टेंभरे ,जि.एफ. बघेले,मनीष ठाकरे,मयूर येळे व मित्र विवेक बोपचे,शुभम क्षिरसागर व सर्व मित्रांना दिले आहे.

Exit mobile version