
गोरेगाव,दि.09ः– तालुक्यातील मणीभाई ईश्वरभाई पटेल हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेज सोनी येथील मार्च 2022 मध्ये झालेल्या 12 वी परीक्षेचा विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून विद्यालयाची विद्यार्थीनी स्नेहा धृवकुमार टेंभरे हिने 533/600=88.83% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.तर द्धितीय क्रमांक रूपेश भुपेद्र रांहागडालेने 517/600=86.17% व तृतीय क्रमांक कु किर्ती खुमेद्र बिसेन 494/600=82.33 हिने पटकावला.
कला शाखेत प्रथम क्रमांक सोमेश्वर किशोर कटरे 457/600=76.16 टक्के,द्वितीय क्रमांक बलशाली भोलाराम खोब्रागडे 417/600=69 व तृतीय क्रमांक सागर मुलचंद कोल्हे 413/600=68.83 याने पटकावला.प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांनीआपल्या यशाचे श्रेय प्राध्यापक व आईवडिलांना दिले.तसेच पास झालेल्या विद्यार्थ्यांचे अंभिनंदन करण्यात आले.