
अर्जुनी मोरगाव :जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या केशोरी येथील दुर्गेश रामभाऊ बोरकर या विद्यार्थ्याची गेट परीक्षेच्या आधारे भारतातील संशोधन आणि उच्च शिक्षणासाठी अग्रेसर असलेल्या भारतीय विज्ञान संस्था (आय आय एस सी) बंगळूर येथील शिक्षण संस्थेत त्याची पीएचडी साठी भौतिशास्त्र विषयात निवड झाली आहे.
दुर्गेशने फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथून बीएससी आणि एमएससी भौतिशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली आहे.पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ५ फेब्रुवारीला घेण्यात आलेल्या गेट परीक्षेत भौतिशास्त्र विषयात त्याने प्रावीण्य प्राप्त केलं .याआधारे त्याची निवड भारतीय विज्ञान संस्था बंगळूर येथे पीएचडी साठी झालेली आहे.या संशोधनासाठी त्याला संस्थेकडून मासिक शिष्यवृत्ती मिळणार असून दुर्गेशने आपल्या यशाचे श्रेय आई -वडील,भाऊ व महाविद्यालयातील शिक्षकवृंदाना दिलं आहे.या यशाबद्दल सर्वस्तरावरून दुर्गेशचे कौतुक केले जात आहे .