
गोरेगाव,दि.17: राज्य परिक्षा मंडळाच्या जाहीर झालेल्या वर्ग 10 वि च्या निकालात तेढा येथील संजय गांधी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाने उत्तम निकालाची परंपरा कायम ठेवत शाळेचा 93.44 टक्के निकाल लागला. प्रथम कु. मिनाक्षी पांडुरंग बिसेन 90.40% ,द्वितीय कु.दिव्यानि योगेंद्र कुंभरे 88.40% ,तृतीय कु.सलोनी संजय कोटांगले 88.00% क्रमांक पटकावला.122 विद्यार्थी परीक्षेला बसलेले त्यापैकी 114 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.विद्यार्थ्यांनी आपल्या उज्वल यशाचे श्रेय प्राचार्य व सर्व विषय शिक्षकांना दिले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्था सचिव भाऊसाहेब गोस्वामी ,सह- सचिव विभाताई, प्राचार्य सुशांत बी.गोस्वामी ,प्रा.डॉ.जी.एम.बघेले,के.डी.ठाकरे,सी.सी.शेन्डे, एल.आर.बिसेन,आर.पी.दूधबुरे व इतर सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.