*मुख्यमंत्र्यांना अति. मुख्य कार्यकारी अधिकारी मार्फत पाठविले निवेदन
गोंदिया-जि.प.शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावी या मागणीसाठी दि. १६ जून ला कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा गोंदिया चे अध्यक्ष संजय उके यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना अति. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
जि. प. गोंदिया येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी रिक्त पदांवर शिक्षकांची नितांत गरज असून विद्यार्थांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार प्राप्त होण्यासाठी रिक्त पदांवर शिक्षकांची पदे तात्काळ भरण्याची मागणी करण्यात आली. अति.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन संघटनेला दिले. शिष्टमंडळात कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके, उपाध्यक्ष किशोर डोंगरवार, अजय शहारे, आशिष वंजारी, रोशन गजभिये व मोठ्या प्रमाणात संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.