
गोंदिया,दि.26 जूनः- राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त,शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमात आदिवासी विकास हायस्कूल व कला,विज्ञान उमावि खजरी/डोंगरगाव येथील विद्यार्थी अश्विन झाळूजी फुल्लूकेचा अनु,जाती गटात जिल्ह्यात प्रथम आल्याबद्दल प्राचार्य खुशाल कटरे यांचासह जिल्हाधिकारी डाॅ.नयना गुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सामाजिक न्याय भवन गोंदिया येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डाॅ.नयना गुंडे होत्या.प्रमुख पाहूणे म्हणून सहाय्यक आयुक्त डाॅ.मंगेश वानखेडे,गोंदिया जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे मा.कार्यवाह प्राचार्य खुशाल कटरे, जि.प.गोंदिया चे समाज कल्याण अधिकारी संजय गणविर,समाजसेविका प्रा.सविताताई बेदरकर उपस्थित होते.प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त डाॅ.मंगेश वानखेडे यांनी प्रस्तुत केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डाॅ.नयना गुंडे व मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पूणे अंतर्गत नागपूर विभागीय बोर्ड नागपूर च्या वतिने मार्च/एप्रिल 2022 मध्ये आयोजित इ.10 वी इ.12 वी च्या परीक्षेत गोंदिया जिल्ह्य़ातील गुणानुक्रमे अव्वल आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला.मान्यवरांच्या हस्ते या प्रसंगी वृक्षारोपण करण्यात आले.संचालन आशिष जांभुळकर व आभार श्री.बगमारे यांनी मानले.