
गोरेगाव,दि.04:- स्थानीय मॉडेल कॉन्व्हेंट एन्ड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव येथे 03 जुलै रोजी शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडले.या प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री तुलसी शिक्षण संस्थेचे सचिव प्रा.आर.डी.कटरे होते.यावेळी प्राचार्य सौ.सी.पी.मेश्राम,संस्था अध्यक्ष सौ.एस.आर.कटरे,प्रशिक्षक विमलताई विद्यालयाचे प्राचार्य मनोज रहांगडाले,शहिद जान्या तिम्या विद्यालयाचे शिक्षक एस.बी.कटरे उपस्थित होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना प्राचार्य मनोज रहांगडाले यांनी प्रशिक्षणातून शिक्षकांना विध्यार्थ्यांना कसे घडविता येईल यासोबतच नवीन शिक्षण प्रणालीवर शिक्षकांना मार्गदर्शन केले. विध्यार्थ्यांना घडवितांना त्यांना शिकवलेल्या भागावर पूर्वज्ञान जागृत करणे. मुलांचे मेंदू हे जन्मजातच विकसित होत असते आपल्याला फक्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करावे. त्याचप्रमाणे वर्गामध्ये शिकविताना विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देऊन शिकवावे असे सांगितले.
दुसर्या सत्रात एस.बी.कटरे यांनी विध्यार्थ्यांना इंग्रजी भाषेत संभाषण कसे करता येईल तसेच शिक्षक म्हणून आपण त्यांना कश्याप्रकारे शिक्षण देऊ शकतो यावर मारदर्शन केले. तसेच विध्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेली इंग्रजी भाषेची भिती कमी करण्यासोबतच अंधश्रद्धा निर्मूलन तसेच सामाजिक जाणिव विध्यार्थ्यांमध्ये रुजविणे आवश्यक असल्याचे सांगितले.विद्यार्थ्यासोंबत अधिकाधिक इंग्रजित संभाषण केल्यास त्यांच्या मनातील भिती दूर होऊ शकते असेही ते म्हणाले.तिसर्या सत्रात शाळेचे संस्थापक आर.डी.कटरे यांनी सुसंस्कृत विद्यार्थी घडविण्यासाठी प्रशिक्षकांनी दिलेल्या मुल्यांच्या वापर करण्याचा सल्ला दिला.संचालन कु.एस.डी.चिचामे व कु.एन.के.ठाकूर यांनी आभार मानले.