सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

0
11

गोंदिया,दि.8 : सामाजिक न्याय विभागाअंतर्गत गोंदिया जिल्ह्यात 6 मुलींचे व 2 मुलांचे असे एकूण 8 वसतिगृह कार्यरत आहेत. सदर वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना राहण्याची व जेवनाची मोफत व्यवस्था करण्यात येते व मुलांना प्रती माहे 500 रुपये निर्वाह भत्ता व मुलींना 600 रुपये निर्वाह भत्ता दिला जातो. तसेच छत्री, रेनकोट, गमबुट व स्टेशनरी साहित्य उपलब्ध करुन देण्यात येते.

         जिल्ह्यातील वसतिगृहाकरीता पुढील अभ्यासक्रमानुसार अर्ज मागविण्यात येत आहेत. शासकीय वसतिगृहात प्रवेशाकरीता शालेय विभागासाठी अंतिम तारीख 15 जुलै, कनिष्ठ महाविद्यालय विभागासाठी 30 जुलै, बिगर व्यवसायीक विभागासाठी 24 ऑगस्ट व व्यवसायीक महाविद्यालय विभागाकरीता अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2022 पर्यंत आहे.

        तरी शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळण्याकरीता आवश्यक अर्जाचा नमुना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,गोंदिया व संबंधित वसतिगृहाचे गृहपाल यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ.मंगेश वानखडे यांनी केले आहे.