जि.प. व पं.स.ची आरक्षण सोडत १३ ला

0
15

गडचिरोली-जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांसह जिल्हा परिषद मतदारसंघांमधील आरक्षणाची सोडत १३ जुलै रोजी काढण्यात येणार आहे. तालुकास्तरावर तहसील कार्यालय आणि पंचायत समित्यांच्या सभागृहीत ही सोडत काढली जाणार आहे. आरक्षणाचे प्रारूप १५ जुलैला प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर २१ जुलैपर्यंत हकरती आणि सूचना स्वीकारल्या जाणार आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील कलम १२ उपकलम(१), कलम ५८(१)(अ) प्रमाणे व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम, १९९६ नुसार अनुक्रमे जि.प. व पं.स. क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवावयाच्या जागा आणि उर्वरित स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा यात निश्‍चित केल्या जाणार आहेत. त्याकरीत ही सोडत काढली जाणार आहे

गडचिरोली पंचायत समितीची -दुपारी ३ वाजता गोंडवाना कला केंद्र पोटेगाव रोड, गडचिरोली.
चामोर्शी पंचायत समितीची – दुपारी ३ वाजता पंचायत समितीच्या सभागृहात
मुलचेरा पंसची सकाळी ११ वाजता पंचायत समिती सभागृह मुलचेरा.
एटापल्ली पंसची दुपारी ३ वाजता पंचायत समिती सभागृहात.
भामरागड पंसची सकाळी ११ वाजता पं.स. कार्यालयात.
अहेरी पंसची सकाळी ११ वाजता पंचायत समिती सभागृहात
सिरोंचा पंचायत समितीची दुपारी ३.३0 वाजता पंचायत समिती सभागृहात                                              पंचायत समिती कोरची सकाळी ११ वाजता पंचायत समितीचे सभागृह
कुरखेडा पंचायत समितीची दुपारी ३ तहसील कार्यालय कुरखेडा
देसाईगंज पंचायत समिती- सकाळी ११ वाजता पंचायत समिती सभागृह.
आरमोरी पंचायत समितीची -दुपारी ३ वाजता तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशाकीय इमारतीत.
धानोरा पंचायत समितीची सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयाचे सभागृहात.

जिल्हा परिषदेतील सर्व जागांच्या आरक्षणाची सोडत १३ ला दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन समितीच्या नीवन सभागृहात होणार आहे.