महाराष्ट्रातील रिक्त 50 हजार शिक्षकांची पदे त्वरित भरा- शिक्षक सहकार संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
32

 गोंदिया -महाराष्ट्र राज्यात मागील 12 वर्षांपासून शासकीय व अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची भरती झालेली नाही तसेच दरवर्षी मोठ्या प्रमाणावर शिक्षक निवृत्त होत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील जवळपास 50 हजार शिक्षकांचे पदे रिक्त आहेत. याचा दुष्परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे, तसेच अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्यानुसार शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांची भरती लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. या ज्वलंत विषयावर शिक्षक सहकार संघटनेने राज्याचे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सचिव सामान्य प्रशासन विभाग ,सचिव ग्रामविकास विभाग यांना राज्याध्यक्ष संतोष पिटटलवाड व नागपूर विभागीय अध्यक्ष रवी अंबुले यांच्या मार्गदर्शनात गोंदिया जिल्हाध्यक्ष सुरेंद्र गौतम यांनी ई-मेल द्वारे निवेदन दिले.तसेच गोंदिया जिल्ह्यात सुद्धा 400 पेक्षा अधिक पदे रिक्त असल्याने या विषयावर जिल्ह्यातील  आमदारांना अवगत करण्यासाठी सदर निवेदन आमदार विनोद अग्रवाल,आमदार परिणय फूके,आ.विजय रहांगडाले,आमदार अभिजीत वंजारी,तसेच शिक्षक आमदार कपिल पाटील यांना सुद्धा देण्यात आले.