
गोंदिया : नीट परिक्षेचा निकाल आज जाहिर झाला असून खेमंत घनश्याम कावळे या विद्यार्थ्याने 535 गुण मिळवून यश संपादन केले आहे.तसेच येथील कुडवा जिल्हा परिषद शाळेचे सहाय्यक शिक्षक दुर्गेश रहागंडाले यांची मुलगी श्रृती दुर्गेश रहांगडाले हिने 642 अंक प्राप्त करीत नीटमध्ये यश सपांदन केले आहे.त्याचप्रमाणे तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथील चैतन्य गौरीशंकर पारधी याने नीटच्या परिक्षेत ६२४ गुण घेवून यश संपादन केले. त्याचप्रमाणे तुलशी होमराज बिसेन,धनश्री बिसेन, लिशा ठाकरे,रुपाली कृष्णा गभणे,खेमंत घनश्याम कावळे,प्रशीक शहारे,हिमांशू कटरे,कु.कलश शरणागत,हिमांशू भगत यांनीही यश संपादन केले आहे.या सर्वांची वैद्यकीय एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. ग्रामीण भागातून जिद्द व चिकाटीच्या भरावर यश कसे संपादन करावे, हे त्यांनी सिद्ध केले आहे. चैतन्यच्या यशाचे समस्त ग्रामवासींयांनी अभियनंदन केले आहे.