पवित्र पाेर्टल कदापि रद्द करणार नाही-दीपक केसरकर

0
15

औरंगाबाद-शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल रद्द करा ही शिक्षक संघटनेची मागणी अयोग्य आहे. आपल्या कारकीर्दीत ती कदापिही मान्य केली जाणार नाही, असे स्पष्ट वक्तव्य शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षण संस्था महामंडळाच्या अधिवेशनात संस्थाचालकांना ठणकावून सांगितले.

अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनानंतर मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती केली जाणार आहे. आरटीई प्रतिकृतीसाठी २०० कोेटींची तरतूद करण्यात आली आहे, असे सांगून दीपक केसरकर म्हणाले की, या पवित्र पोर्टलबाबत शिक्षकांनी एकच गलका सुरू केला आहे. त्याबद्दलही केसरकर यांनी कडाडून विरोध दर्शवला. मात्र या पोर्टलमध्ये काही त्रुटी असतील तर त्याची सुधारणा राज्य सरकार नक्की करेल, याबाबत सुधारणेच्या सूचना संस्थाचालकांनी लवचिकपणे कराव्यात, असेही त्यांनी नमूद केले. जुने पेन्शनचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. न्यायालयाचा निर्णय मान्य असेल आणि शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका राज्य सरकारची आहे, असे केसरकारांनी स्पष्ट केले.