उच्च श्रेणी मुख्याध्यापक कार्यशाळा त्वरीत घ्या

0
50

गोंदिया,दि.07ः महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना समिती व महिला मंच गोंदियाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील व शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये यांना जिल्हा स्तरीय प्रलंबित प्रश्नांसाठी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.यात प्रामुख्याने उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदोन्नती कार्यशाळा त्वरीत घेण्याची मागणी करण्यात आली.यासंबथीत त्वरीत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन साहेबांनी दिले. यासह चटोपाध्याय व निवडश्रेणी प्रस्ताव मंजूर करणे.विद्यूत बिल ग्रामपंचायत स्तरावरून भरणे,२०१७ व २०२१ ची सेवाज्येष्ठता यादी प्रकाशित करणे, केंद्र प्रमुख पदोन्नती करणे या मागण्यांचा समावेश आहे.सर्व समस्या ३१ डिसेंबर पर्यंत पुर्ण करण्याचे आश्वासन साहेबांनी दिले. शिष्टमंडळ सभेत जिल्हा अध्यक्ष राजानंद वैद्य, महिला अध्यक्ष सौ.प्राजक्ता रणदिवे, सरचिटणीस हरिराम येळणे, प्रमोद मानकर, ठवकर सर उपस्थित होते.