
गोरेगाव,दि.२४ः गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण क्रीडा व आरोग्य सभापती इंजि.यशवंत गणविर यांनी आज गुरुवारला शहिद जान्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कुलला आकस्मिक भेट देत विद्यार्थ्यांशी सवांद साधला.
भेटीदरम्यान संपूर्ण शाळेत फेरफटका मारत, प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी हितगुज साधले.यावेळी त्यांनी शालेय पोषण आहार,दाखल खारीज रजिस्टर, हजेरी रजिस्टरची तपासणी केली.शाळेतील भौतिक सुविधा, मुलभूत सुविधांची पाहणी केली.विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमासोबत स्पर्धा परीक्षेचे धडे देण्याची सुचना केली.यावेळी प्रभारी गटशिक्षणाधिकारी एन.जे.सिरसाटे,मुख्याध्यापक प्रभाकर लोंढे उपस्थित होते.