मूलभूत अधिकार आणि कर्तव्य यांची जाणीव ही काळाची गरज-प्राचार्या जैन

0
18

अर्जुनी मोरगाव,दि.27ः सरस्वती ज्ञानदीप कॉन्व्हेंट व जी एम बी हायस्कूल अर्जुनी मोर येथे भारतीय संविधानात असलेले मूलभूत अधिकार तसेच कर्तव्यांची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी संविधान दिवस मोठा उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य शव्या जैन मॅम यांनी तथा पर्यवेक्षक श्री शेंडे यांनी प्रतिमेचे पूजन करून माल्या अर्पण केले. मूलभूत अधिकार आणि कर्तव्य यांची जाणीव प्राचार्यां शव्या जैन यांनी आपल्या मार्गदर्शनातून करून दिले. संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा विकास करण्याकरिता प्रश्नमंजुषा तसेच व संविधानातील घटकावर आधारित पथनाट्य घेण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन तथा आभार सांस्कृतिक प्रमुख श्रद्धा कापगते यांनी केले. रोकडे सर,वाघ तसेच इतर शिक्षकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

माविम कार्यालयात संविधान दिन साजरा

वाशिम दि.२७ ) महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) वाशिम येथील जिल्हा कार्यालयात २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.श्री. नागपुरे यांनी यावेळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे,सहायक जिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख,लेखाधिकारी गौरव नंदनवार, माविम जिल्हा कार्यालयातील कर्मचारी,गोट ट्रस्ट लखनौचे प्रशिक्षक श्री.फारुख व श्री भगत सर आणि 30 गावातील पशुसखी उपस्थित होत्या.