
अर्जुनी/मोर.-अर्जुनी/मोर केंद्रातील शिक्षकांची सत्र २०२२-२३ मधील ६वी शिक्षण परिषद दि. २९/११/२०२२ रोज मंगळवारला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बाराभाटी येथे मा.रेखा गोंडाने मुख्याध्यापक जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, मोरगाव यांच्या अध्यक्षतेखाली व श्री.एस.एम.भैसारे केंद्रप्रमुख यांचे मार्गदर्शनाखाली व केंद्र मुख्या. सरिता घोरमारे, वनिता झोडे-लोदी मॅडम यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. याप्रसंगी केंद्रांतर्गत सर्व मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व सहाय्यक शिक्षक उपस्थित होते.शिक्षण परिषदेमध्ये ताणतणाव व्यवस्थापन ,निपुण भारत अभियान माता गटांची माहिती,शाळा व्यवस्थापन सक्षमीकरण ,विविध शैक्षणिक अँप्स व त्याची उपयोगिता,शाळाबाह्य मुलांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी करावयाचे प्रयत्न व हंगामी स्थलांतरित मुलांचे सर्वेक्षण आदी विषयावर सुलभक मोहन नाईक सर मोरगाव,श्री.संजय कोरे सर कुंभिटोला,कु.शिल्पा गहाणे मॅडम बरडटोली डी.एम.कोल्हे सर तावशी,श्री.पी. टी. गहाणे सर मोरगाव यांनी मार्गदर्शन केले.परिषदेचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख सु.मो.भैसारे यांनी केले. आपल्या प्रस्ताविकेत नाविन्यपूर्ण उपक्रम, आधारकार्ड,संचमान्यता,बालरक्षक अँप, शाळाबाह्य शोध मोहिम, आमची शाळा आदर्श शाळा, ‘पीएम-श्री ‘ रजिस्ट्रेशन ,व ‘पी. एम. पोषण शक्ती’ निर्माण योजना या विषयी मार्गदर्शन केले.सोबतच प्रत्येक शाळेचा आढावा घेतला.
सर्व सुलभक यांनी चर्चात्मक पध्दतीने व प्रात्यक्षिकरित्या विषयाचे सादरीकरण केले व उपस्थित सर्व शिक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बाराभाटी शालेय प्रशासनाचे, परिषद यशस्वी होण्यासाठी उत्तम सहकार्य लाभले. शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन श्री. रविंद्र वालोदे सर बाराभाटी यांनी केले तर उपस्थित सर्वाचे आभार कु.संध्या शहारे मॅडम बाराभाटी यांनी मानले. शेवटी वंदेमातरम गीताने परिषदेची सांगता झाली.