
* मॉडेल कॉन्व्हेंट एंड सायन्स ज्यू. कॉलेज गोरेगांव मधील विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड.*
गोरेगांव :- स्थानीय मॉडेल कॉन्व्हेंट एंड सायन्स ज्यू. कॉलेज गोरेगांव मधील विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड झालेली आहे.जिल्हा स्तरावर आयोजित गणित प्रश्नमंजुषा स्पर्धेत वर्ग 10 वी चे विद्यार्थी समीर ओमेद्र रहांगडाले, हिमांशू गणेश बड़ोले यांनी प्रथम स्थान पटकावले. त्यामुळे त्यांची पुढील स्पर्धेकरिता राज्यस्तरासाठी निवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले, सत्कार करतेवेळी गोंदिया गणित अध्यापक मंडळ चे अध्यक्ष वाय. आर. चौधरी, शाळेचे संस्थापक प्रा.आर. डी. कटरे, संचालिका सौ. एस. आर. कटरे, प्रशासकीय अधिकारी सी. बी. पटले, प्राचार्य सौ. सी. पी. मेश्राम, पर्यवेक्षक कु.एस. डी. चीचामे, आर. एम कटरे सर, आर. बी. कांबळे, राऊत सर, वैद्य सर हे प्रामुख्याने उपस्थित होते.
त्याचबरोबर तालुका स्तरावर आयोजित गणित संबोध परीक्षेत तालुका स्तरावर प्रथम, तसेच शाळा प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मॉडेल कॉन्व्हेंट गोरेगांव मधील विद्यार्थी भुवन राहुल डुंबरे याने वर्ग 5 मधुन तालुका स्तरावर प्रथम स्थान तसेच वर्ग 8 मधून देवांश गणराज रहांगडाले तर वर्ग 5 मधून पारस पवनकुमार रहांगडाले यांनी प्रथम स्थान पटकावून आपले आणि शाळेचे नाव रोशन केले आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्याचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे संस्थापक, प्रशासकीय अधिकारी, पर्यवेक्षक, वर्गशिक्षक, सर्व शिक्षक वृंद तसेच आपल्या आईवडिलांना दिले.