
गोंदिया दि.27 : सन 2022-23 या शैक्षणिक सत्रात ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आरक्षीत (अनु.जाती, विजाभज, इमाव व विमाप्र) प्रवर्गातून पुढील व्यावसायीक शिक्षणाकरीता बी.ई., वैद्यकीय पदवी, बी.एड., एम.एड., बी.पी.एड., एम.एड., एल.एल.बी., एम.बी.ए. पदवी अभ्यासक्रमाला सीईटी व कॅप अंतर्गत प्रवेशाकरीता अर्ज सादर केले असेल अशा विद्यार्थ्यांनी जाती दावा पडताळणीचे प्रकरण जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गोंदिया येथे सादर केले असल्यास प्राप्त व सबळ पुरावे नुसार बहुतांश विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र निर्गमीत करण्यात आलेले आहे. संबंधितांनी दिलेल्या ई-मेल आयडीवर जात वैधता प्रमाणपत्र नियमीत पाठविण्यात येत असून अर्जदारांनी त्यांचे ई-मेल आयडीवर तपासून प्राप्त करुन घ्यावे.
तसेच ज्या अर्जदारांना अद्यापही जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही व ज्यांचे प्रकरणात त्रुटी आढळून आलेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांना त्यांचे प्रकरणातील त्रुटी समिती कार्यालयाद्वारे त्यांचे ई-मेल आयडी व पत्राद्वारे कळविण्यात आलेल्या आहेत. तथापी अद्यापही ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जाती दावा पडताळणी प्रकरणात त्रुटी पुर्तता केलेली नाही व ज्या विद्यार्थ्यांना अद्यापही जात वैधता प्रमाणपत्र ई-मेलद्वारे प्राप्त झालेले नाही त्या विद्यार्थ्यांनी जाती दावा पडताळणी प्रकरणातील त्रुटी संदर्भात आवश्यक त्या मुळ पुराव्यासह व आरक्षीत प्रवर्गातून प्रवेश पुराव्यासह तात्काळ 30 डिसेंबर 2022 च्या आत कार्यालयात उपस्थित राहावे. असे उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गोंदिया यांनी कळविले आहे.