खाजगी कायम विनाअनुदानित शाळांचा शाळा बंद ठेऊन विधान भवनावर घंटानाद मोर्चा

0
12

गोरेगांव,दि.29 :– शिक्षणाचा अधिकार कायदा अंतर्गत येणार्‍या शाळा संस्था चालकांनी आरटीई अनुदान थकबाकीच्या मागणीला घेऊन तसेच टीसी विना प्रवेश कायदा रद्द करावे एसी मागणी घेऊन आरटीई फाउंडेशन इंडीया चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन काळबांडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा गोंदियाचे जिल्हा अध्यक्ष प्रा. आर. डी. कटरे तसेच गोंदिया जिल्ह्य़ातील आरटीई फाउंडेशन जिल्हा गोंदिया चे सदस्य, शिक्षक यांच्या उपस्थितीत दी 28.12.2022 ला शाळा बंद ठेवत विधान भवन नागपूर येथे धडक मोर्चा दिला. मागील सत्र 2012-13 ते 2021-22 पर्यंतची दुर्बल व वंचित घटका अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची थकबाकी प्रतिपूर्ति शाळांना दिलेली नाही. ती थकबाकी प्रतिपूर्ति शासनाने त्वरित शाळांना द्यावि अन्यथा सत्र 2022-23 चे आरटीई अंतर्गत विद्यार्थी खाजगी शाळांवर शासनाने लादू नये. जर शासनाने थकबाकी प्रतिपूर्ति शाळांना वितरित केली नाही तर सत्र 2022-23 चे शाळेकडून नाकारण्यात येतील असे आव्हान खाजगी संस्था चालकांकडून मोर्चा काढून करण्यात आले. तसेच टीसी विना प्रवेश कायदा शासनाने काढल्यामुळे खाजगी शाळांना आर्थिक नुकसान होत आहे. उपरोक्त कायदा महाराष्ट्र शासनाने त्वरित मागे घ्यावा याकरिता विधान भवन नागपूर येथे घंटानाद मोर्चा देत राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. सचिन काळबांडे यांच्या नेतृत्वाखाली गोंदिया जिल्हाध्यक्ष प्रा. आर. डी. कटरे यांच्या उपस्थितीत शिक्षा मंत्री दिपक केसरकर यांना निवेदन सादर करण्यात आले.