Home शैक्षणिक पिछडावर्ग आयोग अध्यक्षांना स्टुडंटस राईटसच्यावतीने निवेदन

पिछडावर्ग आयोग अध्यक्षांना स्टुडंटस राईटसच्यावतीने निवेदन

0

नवी दिल्ली,दि.18ः- स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व ओबीसी युवा अधिकार मंचचे सयोंजक उमेश कोरराम यांनी विविध मुद्यावर 17 फेबुवारीला राष्ट्रीय पिछडा वर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन सादर केले.

UPSC तथा MPSC च्या परीक्षेत नॉन क्रिमी लेअर मुळे अनेक अडचणी निर्माण होतात. त्यात शेकडो उमेदवारांना परीक्षा पास करूनही अथवा मुलाखतीच्या वेळी प्रक्रियेतून बाहेर काढले जाते.केंद्र सरकारच्या DoPT विभागाद्वारे नाहक अडवणूक केली जाते. यात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केलेले जवळपास 200 विद्यार्थी अडकून आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगात सुद्धा अनेकांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे याकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावे अशी मागणी अहिर यांच्याकडे कोरराम यांनी केली आहे.

भविष्यात अश्या प्रकारचा कुठलाही अन्याय होऊ नये आणि नॉन क्रिमीलेअरसाठी DoPT च्या 1993 च्या कार्यलयीन आदेशानुसारच कार्यवाही व्हावी असेही सुचवले. सर्व तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांना विशेष प्रशिक्षण देण्यात यावे.आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सुद्धा प्रशिक्षित करण्यासाठी मागासवर्गीय आयोगाने पुढाकार घ्यावा अशी विनंती निवेदनातून कोरराम यांनी केली आहे.

Exit mobile version