शिक्षकांची बिंदूनामावली निश्‍चित करा

0
31

गोंदिया-प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांची बिंदू नामावली अद्यावत करण्यात यावी, या मागणी सह प्रलंबित समस्या निकाली काढण्यासाठी सोमवार, ३ एप्रिल २0२३ ला कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके यांच्या नेतृत्वात शिक्षणाधिकारी (प्राथ.) डॉ. महेंद्र गजभिये यांच्या सोबत चर्चा करण्यात आली.
जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची बिंदू नामावली अद्यावत करण्यात यावी, जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांची वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी पदोन्नती प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात यावे, अस्थायी शिक्षकांना स्थायी करण्यात यावे, प्रोत्साहन भत्ता थकबाकी सर्व शिक्षकांना देण्यात यावे, सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा तिसरा हफ्ता जी. पी. एफ.धारकांच्या खात्यावर जमा करण्यात यावा तसेच डी.सी.पी.एस./ एन.पी.एस. धारकांना रोखीने देण्यात यावा, आंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची डी.सी.पी.एस./ एन.पी एस. कपात राशी संबंधित जिल्हा परिषदेतून शिक्षकांच्या एन.पी.एस. खात्यावर वर्ग करण्यात यावी, जिल्ह्यातील एन.पी.एस. शिक्षकांची कपात राशी एन.पी.एस. खात्यावर जमा करण्यात यावी, सेवानवृत्त श्िाक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना उपदान, अंशराशिकरण, रजा रोखिकरण, गट विमा सर्व लाभ देण्यात यावे, अशा विविध मागण्यांचा समावेश होता.
शिष्टमंडळात कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके, वीरेंद्र भोवते, रोशन गजभिये, दीक्षांत धारगावे, राजेश गजभिये, उत्क्रांत उके, प्रमोद बघेले, अमित गडपायले, अजय शहारे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.