पहिले पाऊल-शाळा पूर्व तय्यारी अभियान
अर्जुनी /मोर ता.27:– तसेही आजचं ढगाळ वातावरण अन् रिमझिम पाऊस आणि यातचं सरकारचं फर्मान की विद्यार्थ्यांसाठी शाळा पूर्व तय्यारी अभियान राबवा.
बिचारे विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी सजले संवरले परंतु त्यांनी परिधान केलेल्या आपल्या लुगड्याचा पहेराव मात्र ओलांचिंब होऊ नये म्हणून छत्र्यांची साथ घेतली. दोन छत्र्यांनी तिघींची काळजी घेतली. या विद्यार्थीनी आहेत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कान्होली ग्रामपंचायत अंतर्गत जब्बारखेडा इथल्या. उल्लेखनीय असे की महाराष्ट्र शासनाची धारणा अशी आहे की,शिक्षणाचा खरा पाया हा बालवयातच मजबूत केला गेला पाहिजे,बालकांचा 80 टक्के बौद्धीक विकास हा वयाच्या 8 व्या वर्षापर्यंत होतो.परिणामी पुढच्या शिक्षणाची प्रक्रिया सहज आणि सोपी होते, त्यामुळे पहिल्यांदाचं शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्य शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने महाराष्ट्रात पहिले पाऊल -शाळा पूर्व तय्यारी अभियान, आजपासून (ता.27) हाती घेण्यात आले आहे.याचा लाभ जुन मध्ये प्रवेश घेणाऱ्या 65 हजार शासकीय शाळामधील सुमारे 15 लाख विद्यार्थ्यांना होणार आहे.हा उपक्रम येत्या 30 एप्रिल पर्यन्त सुरु राहणार आहे.





