मॉडेल कान्वेंट गोरेगांवच्या वर्ग 5 वीच्या 8 विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपकरिता निवड

0
13

गोरेगांव :– स्थानीय मॉडेल कान्वेंट एण्ड सायन्स ज्यू. कॉलेज गोरेगांव मधील वर्ग 5 वी मध्ये शिकत असलेले 8 विद्यार्थी आर्यन मधुकर पवार, अंशुल रामरतन कामथे, भुवन राहुल डुंभरे, एंजल मोहरलाल रहांगडाले, राज दामेस्वर बघेले, पारस पवनकुमार रहांगडाले, अथांग मोहनकुमार टेंभरे, आर्या किशोरकुमार बोपचे यांची स्कॉलरशिप करिता निवड झालेली आहे. त्यांनी शाळेचे नाव गौरवांवित केले आहे. शाळेचे संस्थापक प्रा. आर. डी. कटरे, प्रशासकीय अधिकारी  सी. बी. पटले, प्राचार्य सौ सी. पी.मेश्राम, पर्यवेक्षक कु.एस. डी. चीचामे, यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.आर. बी. कांबळे लिपिक, वर्ग शिक्षक, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्याबद्दल सर्व विद्यार्थ्याचे हार्दिक अभिनंदन व कौतुक केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्था सचिव, प्रशासकीय अधिकारी, प्राचार्य, पर्यवेक्षक, वर्गशिक्षक, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व आपले आईवडील यांना दिले.