तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक जीवन सुलभ करा- स्मिता बेलपत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी

0
12
‘सुशासन व तंत्रज्ञानाद्वारे जीवन सुलभतेला प्राधान्य देणे’ या विषयावर जिल्हास्तरीय सभा संपन्न.
गोंदिया, (दि. 4): केंद्र शासनाच्या माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर मध्ये होऊ घातलेल्या ‘3ऱ्या मुख्य सचिव बैठकी’च्या अनुषंगाने राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार (3 ऑगस्ट) जिल्हाधिकारी कार्यालयात  शिक्षण विभागाची सभा निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी म्हणाल्या की या 21 व्या शतकात तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक जीवन सुलभ कसे करता येईल याकडे विशेष लक्ष केंद्रित केले पाहिजे जेणेकरून शासन हे सुशासन आहे अशी भावना जनमानसात निर्माण होईल.
सदर सभेचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गोंदिया व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्य.)च्या वतीने करण्यात आली होते. त्यात निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे  यांनी सभेचे अध्यक्षस्थान भूषविले.
सभेचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे  शिक्षणाधिकारी (माध्य.) कादर शेख यांनी करून उपस्थितांना सभेच्या आयोजनाचे उद्देश स्पष्ट केले. तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. रमेश राऊत यांनी सभेचे मुख्य विषय व आपली भूमिका याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच   जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉ. नरेश वैद्य, भाऊराव राठोड व पूनम घुले यांनी एकेका मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणली व उपस्थितांना बोलते केले. सोबतच शिक्षणाधिकारी कादर शेख यांनीही उपस्थितांसोबत सविस्तर चर्चा केली.
  शासनाने दिलेल्या ‘1) शासकीय शाळांमध्ये शाळा सोडण्याचा दाखला/दुय्यम प्रत/ गुणपत्रक जारी करणे/ सुधारीत करणे यात सुलभता आणणे, 2) प्रमाणपत्र/गुणपत्रक यांची पडताळणी सुलभ करणे, 3) पुनर्मुल्यांकन/ श्रेणीवाढ परीक्षेचे परिचय करून देणे, 4) प्रवेश परीक्षेचा सुलभतेकरिता शाळांची जोडणी, 5) विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीसाठी सुलभता, 6) सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रासाठी डिजी लॉकर चे वापराबाबत चे सार्वत्रिकीकरण करणे, 7) शाळांमध्ये दर्जेदार पायाभूत सुविधा, 8) विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीमध्ये सुधारणा, 9) या प्रकारचे इतर विषय किंवा क्षेत्र’ या नऊ मुद्यांवर सभेला उपस्थित सर्वांनी सविस्तर चर्चा केली व लेखी स्वरूपात आपले मत मांडून चर्चेत सक्रिय रुपात सहभाग नोंदवला.
    सभेला जिल्हा क्रिडा अधिकारी घनश्याम राठोड, नवोदय विद्यालय नवेगावबांध चे प्राचार्य डी. एस. थुल, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी डी. बी. दिघोरे, सर्व पं. स. गटशिक्षणाधिकारी कुसुम पुसाम (आमगाव), विशाल डोंगरे (सालेकसा), महेंद्र मोटघरे(देवरी), जे. एस. राऊत (गोंदिया), विनोद चौधरी (तिरोडा), एन जे सिरसाटे (गोरेगाव), आर. एल. मांढरे (अर्जुनी/मोर), सुभाष बागडे (सडक अर्जुनी),  केंद्रप्रमुख रेणुका जोशी, निवडक शाळांचे मुख्याध्यापक व प्राचार्य, केंद्रप्रमुख, शा. व्य. समिती सदस्य, पालक, विषय साधनव्यक्ती व शिक्षक उपस्थित होते.
या सभेचे सूत्रसंचालन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता पूनम घुले यांनी करून कार्यक्रमाविषयी संपूर्ण माहिती दिली. तर शेवटी उपस्थितांचे आभार अधिव्याख्याता भाऊराव राठोड यांनी मानले.
 सभेच्या यशस्वीतेसाठी साधनव्यक्ती वशिष्ठ खोब्रागडे, अनिता ठेंगडी, सुनील ठाकूर, ब्रजेश मिश्रा, धनवंत कावडे, सत्यवान शहारे, सुनील बोपचे, भाऊलाल चौधरी, प्रदीप वालदे,  शिक्षक सुनील हरिनखेडे, सुभाष मारवाडे, दिनेश उके, राजेंद्र बन्सोड, मंगेश बोरकर व इतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.