37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ गोंदिया कृषी विज्ञान केंद्रास उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार

गोंदिया कृषी विज्ञान केंद्रास उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार

0
25

blank

गोंदिया, दि.4 : भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) अंतर्गत पुणे येथील कृषी तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्था (अटारी) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्यातर्फे छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवारी (ता.२८) ते रविवार (ता.३०) या कालावधीत आयोजित महाराष्ट्र, गोवा व गुजरात राज्यातील कृषी विज्ञान केंद्राची ६ व्या कार्यशाळेत कृषी विज्ञान केंद्र, हिवरा-गोंदिया, जि.गोंदिया यास उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार मिळाला.

       विविध माध्यमांचा वापर करून नविन तंत्रज्ञानाचा प्रसार, प्रात्यक्षिके, शेती चाचण्या, विस्तार उपक्रम इत्यादी विषयी सादरीकरण केले. तसेच कृषी विज्ञान केंद्र, हिवरा-गोंदिया मार्फत गोंदिया जिल्ह्यातील हळद पहिल्यांदाच दुबईला निर्यात करण्यात आली. सदर कृषी विज्ञान केंद्र तर्फे शेतकऱ्यांना विविध बाबींवर मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. या सर्व बाबींचा विचार करून कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या हस्ते व डॉ.जगदीश राणे, सीआयएएच, बिकानेर, डॉ. लाखन सिंग, माजी संचालक, अटारी पुणे, डॉ. डी.बी. देवसरकार, संचालक, विस्तार शिक्षण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या उपस्थितीत उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. सय्यद शाकीर अली यांना प्रदान करण्यात आला.

    यावेळी उपमहासंचालक (कृषी विस्तार) डॉ. यू.एस.गौतम, माजी उपमहासंचालक (कृषी विस्तार) डॉ. किरण कोकाटे, डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. एस.आर.गडाख, नवसारी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. झेड.पी.पटेल, इंफाळचे कुलगुरू डॉ. अनुप मिश्रा, अटारीचे संचालक डॉ. एस.के.रॉय, डॉ. पंदेकृविचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे व मुख्य विस्तार व शिक्षण कार्यकारी अधिकारी डॉ. उमेश चींचमलातपुरे आदी उपस्थित होते.

blank