इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 7 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

0
11

गोंदिया, दि.4 : परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरीता 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2023 याकालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापी, शाळांना शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरीता दिनांक 7 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दिनांक 7 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी.

      शिष्यवृत्ती परीक्षेकरीता ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी नियमीत शुल्कासह कालावधी 1 सप्टेंबर ते 7 डिसेंबर 2023. विलंब शुल्कासह कालावधी 8 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2023. अतिविलंब शुल्कासह कालावधी 16 डिसेंबर ते 23 डिसेंबर 2023. अति विशेष विलंब शुल्कासह कालावधी 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत आहे.

       दिनांक 31 डिसेंबर 2023 नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.