
गोंदिया–मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने आयोजित डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात येथील प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे.
परीक्षा स्पर्धेत प्रोग्रेसिव्ह इंग्रजी विद्यालयातील इयत्ता सहावीची हिमांशी बिजेवार व प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल विद्यालयातील इयत्ता सहावीचा रिदम भायदे यांनी गुणवत्ता श्रेणी प्राप्त केली. या दोन्ही विद्यार्थ्यांची परीक्षा स्पधे्रच्या द्वितीय टप्प्यासाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांचा संस्थाध्यक्ष डॉ. पंकज कटकवार, सचिव डॉ. निरज कटकवार, प्राचार्य ओ. टी. रहांगडाले, कुमुदिनी तावाडे, आशा राव, मिनाक्षी महापात्रा, रुपकला रहांगडाले, विकास पटले, महेश पटले, नुतन पारधी, योगश्ेवरी रहांगडाले, सपना बिरखेडे, प्रशांत सारंगपुरे, स्वाती सोनी, सोनाली भांडारकर, वीना चौव्हाण, शुभांगी सारंगपुरे, ममता धरमकर, भाग्यचंद लेंडे, अभिलाषा तिवारी, भुमेश्वरी गौतम, राजेंद्र अजिते आदींनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
…