चिरचाळबांधच्या हरीहरभाई पटेल विद्यालयात लुईस ब्रेल यांची जयंती साजरी

0
13

आमगाव,दि.04- तालुक्यातील हरिहरभाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चिरचाळबांध येथे आज ४ जानेवारी गुरुवारला ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त ” दृष्टीबाधीत विद्यार्थ्यांचे शिक्षणात पुनर्वसन” या विषयावर वकृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आली.कार्यक्रमाला प्राचार्य बन्सीधर शहारे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटक व बक्षीस वितरक म्हणून आमगाव पं.स.गटशिक्षणाधिकारी व्हि.एस.डोंगरे उपस्थित होते.प्रमुख पाहुणे म्हणून चिरचाळबांध केन्द्र प्रमुख गुलाब भुसारी,समावेशक तज्ञ जी.एस धावडे,समन्वयक विलास मलवार,के.डी.भोंगाडे, विषय शिक्षिका कु.प्रतिभा कोरे,कु आम्रपाली ऊके,कु.दिपा बिसेन,प्रा.परमाऩद चुटे उपस्थित होते.यावेळी लुईस ब्रेलच्या जिवणावर प्रकाश घालण्यात आले.शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले.आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक कु.सलोणी घनश्याम भांडारकर वर्ग ९वा (ब), द्वितीय कु.आर्या लुकेश्वर गौतम, तृतीय कु.जानवी राजकुमार चौधरी तर वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. लउम्बईनई मेश्राम वर्ग १२ वा, द्वितीय कु. सलोनी हत्तीमारे, तृतीय क्रमांक कु.स्वाती पारधी यांनी प्राप्त केले.प्रास्ताविक प्रा.परमानंद चुटे यांनी तर सूत्रसंचालन प्रा.धर्मेंन्द्र मेहर यांनी केले.तर आभार प्रा.रामदास बांद्रा यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.