Home शैक्षणिक जि. प.शाळा, मोरगाव शाळेचा अथर्व एन.एन.एम.एस.परीक्षेत जिल्ह्यात अव्वल

जि. प.शाळा, मोरगाव शाळेचा अथर्व एन.एन.एम.एस.परीक्षेत जिल्ह्यात अव्वल

0

अर्जुनी मोर. -महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत दिनांक २४ डिसेंबर २०२३ ला घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (एन.एम.एम.एस.)विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, मोरगाव येथील दहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, सदर शाळेतील अथर्व कमलेश कऱ्हाडे हा अनुसुचित जाती प्रवर्गातून जिल्ह्यातून अव्वल स्थान पटकाविले आहे.
सण २००८-०९ पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एन.एम.एम.एस.)परीक्षा ही मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांचे मार्फत राबविली जाते.आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्याचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना, तसेच त्यांचे १२ पर्यंतचे शिक्षण पूर्ण व्हावे या हेतूने दरमहा रु.१५००/-(वार्षिक-१५,०००/-) शिष्यवृत्ती स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येते.इयत्ता आठवीतील आर्थिक दुर्बल घटकांतील ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.१,५०,०००/- पेक्षा कमी आहे अशा पालकाच्या पाल्याना गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्ती देण्यात येते.
जि. प.वरिष्ठ प्राथमिक शाळा, मोरगाव येथील शिक्षकवृंदानी अतिरिक्त सराव वर्ग घेऊन, विद्यार्थ्यांना यश संपादन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला.
सदर परीक्षेत अथर्व कमलेश कऱ्हाडे,मोहित भोजराज लाडे, जान्हवी सुहास शहारे, स्नेहा अनिल मानकर,अंजली गुणवन्त वलके, देवांशी हेमराज मस्के, खुशबू अज्ञान हातझाडे,लीना मुकेश नवरंग, खुसवंत पुष्पराज शहारे, रितेश भीमराव टेम्भुरने, आदींनी यश संपादन केले. अलीकडेच प्रकाशित झालेल्या गुणवत्ता यादीत खुशबू अज्ञान हातझाडे व अथर्व कमलेश कऱ्हाडे यांनी स्थान मिळविले असून शाळेच्या यशाची परंपरा कायम ठेवली . सदर विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा गोंडाने, सु.मो.भैसारे,विषयशिक्षक पुरुषोत्तम गहाणे, रेवानंद उईके,विलास भैसारे, जितेंद्र ठवकर, वामन घरतकर, अचला कापगते-झोळे,रुपाली मेश्राम यांनी अभिनंदन करून ,उज्ज्वल भविष्याच्या कामना केली.

Exit mobile version