श्री जे के पाल कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातून कु. वेदांती पाल प्रथम

0
10

व्याहाड खुर्द- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, नागपूर बोर्डद्वारे घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक विभाग बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात अशोका बहुउद्देशीय शिक्षण संस्था व्याहाड खुर्द द्वारा संचालित श्री. जे. के. पाल कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाने यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली.
२०२४ बोर्ड परिक्षेकरिता एकूण ६३ विद्यार्थी परीक्षेला बसले त्यापैकी ६ विद्यार्थी Distinction, ४८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.विद्यालयातून कु. वेदांती पाल हिने ७९.०० टक्के गुण घेऊन प्रथम आली, द्वितीय क्रमांक हर्षल भगत ७८.३३ टक्के गुण तर तृतीय क्रमांक कु. रिचिता पाल व ओमकार भगत यांनी ७७.५० टक्के गुण घेतला आहे.सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अशोका बहुउद्देशीय शिक्षण संस्था व्याहाड खुर्दचे अध्यक्ष  अविनाश पाल, संचालक देवानंद पाल, स्वामी विवेकानंद कॉन्व्हेंट च्या प्रिंसिपल सौ. ज्योती पाल यांनी त्यांना पुष्पगुच्छ घेऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच श्री. जे. के. पाल कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य श्री रोशन गावतुरे, श्री चुनारकर , प्राजक्ता गेडाम , प्राजक्ता गोलेपल्लीवार, स्नेहा मॅडम, प्रीती मॅडम तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदानी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.