30.2 C
Gondiā
Saturday, June 15, 2024
Home Top News सेवानिवृत्त डीवायएसपी व पोलीस निरीक्षकांना करार पद्धतीने कामावर घेणार…

सेवानिवृत्त डीवायएसपी व पोलीस निरीक्षकांना करार पद्धतीने कामावर घेणार…

0
22

जात पडताोळणी समितीकरीता सामाजिक न्याय विभागाचा निर्णय

खेमेंद्र कटरे/ गोंदिया,दि.२२::   राज्यातील अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीमध्ये कार्यालयीन कामकाज सुरळित होणेकरिता राज्य पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक व पोलीस निरीक्षक अधिका-यांच्या सेवा करार पध्दतीने ठरवून दिलेल्या कामाकरिता घेण्यासाठी आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य,पुणे व लेखाधिकारी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे,यांच्या स्तरावर मान्यता देण्यात आली आहे.त्यामुळे या जातपडताळणी समितीमधील रिक्त पदावर आत्ता कंत्राटी पोलीसअधिकारी नियुक्तीचा मार्ग मोकळे करुन राज्यातील महायुती सरकारने नवीन पदभरतीची अपेक्षाच करु नका असेच स्पष्ट केले आहे.

सदर भरती संदर्सात भहआयुक्त, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती,पुणे/ठाणे/पालघर/नाशिक/नाशिक-२/नंदुरबार/धुळे/ छत्रपती संभाजीनगर/किनवट/नागपुर/गोंदिया/अमरावती/यवतमाळ/गडचिरोली/चंद्रपूर यांना पत्र क्र.आस्था-२०२४/प्र.क्र.२६/पोलीस पदे/का-१/१३३६ दिनांक.२१/०५/२०२४ नुसार कळविण्यात आले आहे.

   सुधारित आकृती बंधानुसार पोलीस दक्षता पथकातील पोलिस उपअधिक्षक व पोलिस निरीक्षक यांच्या रिक्त असलेल्या पदानुसार,या कार्यालयाने मानधन तत्वावर बाह्यस्त्रोताव्दारे पोलीस दक्षता पथकातील पदे भरण्यास मंजुरी दिलेल्या पदांची संख्या विचारात घेऊन,प्रलंबित प्रकरणांची संख्या आणि पोलीस दक्षता पथकातील पदांची असणारी निकड लक्षात घेऊनच संदर्भिय समान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. २७१५/प्र.क्र१००/१३, दिनांक-१७.१२.२०१६ च्या शासन निर्णयाच्या अधिन राहून अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयातील दक्षता पथकाकरिता सुधारित आकृतीबंधानुसार रिक्त असलेल्या पोलीस दक्षता पथकातील पोलिस उपअधिक्षक व पोलिस निरीक्षक यांची विहीत कार्यपध्दतीचा अवलंब करुन जाहिरात देऊन पात्र अधिका-यांचे अर्ज मागविण्यांत यावेत. प्राप्त अर्जातून पात्र उमेदवाराची निवड करुन करार पध्दतीने ११ महिन्यांच्या कालावधी करिता नियुक्ती करण्यांत यावी असे निर्देश देण्यात आले आहेत.
   नियुक्त केलेल्या उमेदवाराच्या मासिक पारिश्रमिक व भत्यांची परिगणना करुन मासिक पारिश्रमिकाची रक्कमेस या कार्यालयाची मान्यता घेऊनच नियुक्त उमेदवारांचे मानधन अदायगी करण्यात यावी. सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक व पोलीस निरीक्षक पदे अधिका-यांच्या सेवा करार पध्दतीने घेताना आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. या कार्यालयाने मानधन तत्वावर बाह्यस्त्रोताव्दारे पोलीस दक्षता पथकातील पोलिस उपअधिक्षक व पोलिस निरीक्षक ही पदे भरण्यास दिलेली मान्यता ही सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक व पोलीस निरीक्षक पदे सेवा करार पध्दतीने घेताच संपुष्टात येईल.याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावे, असे आयुक्त,आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य,पुणे यांच्या मान्यतेने हे आदेश जारी करण्यात येत आहेत असे पत्र चंचल पाटील,सहसंचालक,आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य,पुणे यांनी २१ मे रोजी काढले आहे.