शाळा प्रवेशोत्सव दिनी आरोग्य अधिकाऱ्यांच्या शालेय भेटी

0
302

पहिल्याच दिवशी आरोग्य अधिकारी पोहचले शाळेत

गोंदिया,दि.०१-जिल्ह्यात दि.१ जुलै रोजी सर्वत्र शाळा सुरू झाल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांनी अनोखा उपक्रम हाती घेतला.जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभाग प्रमुखांना तालुक्यातील किमान एका शाळेंला भेट देऊन शालेय मुलांचे स्वागत करणे तसेच शासनातर्फे देण्यात आलेले पुस्तक मुलांना वाटप करणे असा हर्षित प्रयोग करण्याचा निर्धार केला.शाळा प्रवेशोत्सव 2024 अंतर्गत विद्यार्थ्यांचे आनंददायी पद्धतीने स्वागत करणे हा एकमेव उद्देश होता.भेटी दरम्यान सर्व नवीन मुलांचे स्वागत करुन त्यांचा उत्साह वाढविणे असा अनोखा उपक्रम होता.
आरोग्य विभागाचे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे यांनी यावेळी गोरेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा कवलेवाडा येथे भेटी देवुन मुलांचा आनंद द्विगुणित केला. त्यावेळी आरोग्य विभागाचे आरोग्य सहाय्यक रविंद्र श्रीवास,शालेय समिती पदाधिकारी,मुख्याध्यापक,शालेय शिक्षक व गावातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ.अरविंदकुमार वाघमारे यांनी यावेळी मुलांना पुस्तके वाट्प केली तसेच मुलांशी साध्या व सोप्या भाषेत आरोग्य विषयक हितगुज केले तर शाळेतील मुख्याध्यापक यांना पावसाळ्याच्या दिवसात मुलांना कुठलेही साथरोग आजार उद्भवणार नाही याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे सुचित केले.
जिल्हा परिषदेचा मुलांचा आनंद द्विगुणित करण्याचा अनोखा उपक्रम
पहिल्याच दिवशी आरोग्य अधिकारी पोहचले शाळेत

जिल्ह्यात दि.1 जुलै रोजी सर्वत्र शाळा सुरू झाल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांनी अनोखा उपक्रम हाती घेतला.जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभाग प्रमुखांना तालुक्यातील किमान एका शाळेंला भेट देऊन शालेय मुलांचे स्वागत करणे तसेच शासनातर्फे देण्यात आलेले पुस्तक मुलांना वाटप करणे असा हर्षित प्रयोग करण्याचा निर्धार केला.शाळा प्रवेशोत्सव 2024 अंतर्गत विद्यार्थ्यांचे आनंददायी पद्धतीने स्वागत करणे हा एकमेव उद्देश होता.भेटी दरम्यान सर्व नवीन मुलांचे स्वागत करुन त्यांचा उत्साह वाढविणे असा अनोखा उपक्रम होता.