आमदार रहांगडाले यांच्यातर्फे विद्यार्थ्याना स्कूल बॅगचे वाटप

0
258

तिरोडा,दि.०१:- विधानसभा क्षेत्रात सिंचनविषयक सुविधांबरोबरच शैक्षणीक क्षेत्रात विकासाचे पाऊल टाकत तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या तर्फे जिल्हा परिषद तसेच नगर परिषद क्षेत्रातील इयत्ता १ ली व २ रीच्या विध्यार्थ्याना शाळेच्या पहिल्या दिवशी स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. यामध्ये विधानसभा क्षेत्रातील तिरोडा व गोरेगाव तालुक्याचा समावेश असून विध्यार्थी संख्या बघता पूरवठादाराकडून वेळेवर पुरवठा न होऊ शकल्याने गोंदिया तालुक्यातील शाळेतील विद्यार्थ्यांना येत्या १५ दिवसात वाटप होणार आहे.तसेच इयत्ता ३ री व ४ थीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा वाटप होणार असल्याची माहिती आमदार रहागंडाले यांनी दिली. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी बॅग भेट मिळाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आमदाराच्या या कार्याबद्दल कौतुक होत आहे.