
देवरी,दि.१- स्थानिक छत्रपती शिवाजी विद्यालय आणि कनिष्ट महाविद्यालय येथे आज सोमवरी (दि.१) शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य मनोज भुरे हे होते. प्रमुख अतिथींमध्ये एस. टी. भांडारकर , पी. एस. खैरे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच शासनाच्या निर्देशानुसार उपस्थित वर्ग ५ ते ८ च्या सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व अध्यक्ष यांनी आपल्या भाषणातून शाळेच्या पहिल्या दिवसाचे महत्व पटवून दिले व आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच संचालन श्री. एस. टी. मेश्राम यांनी केले. उपस्थितांचे आभार एस. जी. काशिवार मानले. शाळा प्रवेशोत्सवाचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष, प्रमुख अतिथी, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.