मॉडेल कॉन्व्हेंट एन्ड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय गोरेगावची पालक शिक्षक सभा संपन्न

0
77

गोरेगाव :- स्थानीय मॉडेल कॉन्व्हेंट एन्ड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव येथे पालक शिक्षक सभा चे आयोजन करण्यात आले होते.पालक शिक्षक सभेला संस्था सचिव प्रा आर. डी कटरे हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. तसेच शाळेचे प्रशासकीय अधिकारी  सी बी पटले, प्राचार्या सौं सी पी मेश्राम सर्व शिक्षक वृंद व पालक सभेला उपस्थित होते.
पालक सभे मध्ये विध्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासंदर्भात चर्च करण्यात आली. त्याचबरोबर अभ्यासाबरोबर विध्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक विकास करण्यासंदर्भात पालकांसोबत विचार विमर्श करण्यात आले. सभेत शैक्षणिक सत्र 2024-25 चे पालक शिक्षक संघ गठीत करण्यात आला. त्यामध्ये अध्यक्ष स्थानी शाळा प्राचार्या सौं सी पी मेश्राम, उपाध्यक्ष  दामेश्वर बोपचे यांची निवड करण्यात आली. सभेत सर्व प्रथम प्राचार्या यांनी पालकांसमोर वार्षिक नियोजन याची माहिती सादर केली. पालक सभेला अध्यक्ष स्थानी उपस्थित प्रा आर. डि कटरे यांनी पालकांशी चर्चा करत विध्यार्थ्यांच्या सर्वागीन विकास तसेच विध्यार्थ्याच्या गुणवत्ता वाढीवर विशेष भर देण्यात येईल याची हमी दिली. कार्यक्रमाचे संचालन कु. एस. डि. चिचामे यांनी केले.