जिल्हास्तरीय भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धा थाटात; विजयी चमू करणार विभागात जिल्ह्याचे नेतृत्व

0
47

लोकनृत्य स्पर्धेत अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय शाळा डव्वा प्रथम तर भूमिका अभिनय स्पर्धेत अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय शाळा सरांडी प्रथम….

गोंदिया,(दि. 12): राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण उपक्रम अंतर्गत “भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धा 2024-25” चे आयोजन ‘जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गोंदिया’ च्या वातानुकूलित सभागृहात दि. 11 ऑक्टोबर 2024 ला संस्थेचे प्राचार्य डॉ. नरेश वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली व विभाग प्रमुख अधिव्याख्याता पूनम घुले, अधिव्याख्याता डॉ. भाऊराव राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी जीवनात आनंद मिळविण्यासाठी एकतरी कला जपावी असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. नरेश वैद्य यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख अधिव्याख्याता पूनम घुले यांनी करून स्पर्धेबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थिती मध्ये असलेले डॉ. भाऊराव राठोड यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील अभिनयाचे दाखले देत विद्यार्थ्यांना यथोचित असे मार्गदर्शन केले. यात जिल्ह्यातील जिल्हा परिषद हायस्कुल गोरेगाव, ककोडी, अर्जुनी मोर, शासकीय समाजकल्याण विभाग संचालित अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शाळा डव्वा ता. सडक अर्जुनी, सरांडी (ता. तिरोडा), मुलांची शाळा नंगपुरा मूर्री, यांनी सहभाग नोंदविला व पर्यावरण संरक्षण, जंगल संरक्षण या विषयावर लोकनृत्य सादर केले. तसेच पौष्टिक आहार व आरोग्य, निरोगी वाढ, वैयक्तिक सुरक्षा , इंटरनेट चा सुरक्षित वापर आणि मीडिया साक्षरता, अमली पदार्थांचा गैरवापर, त्याची कारणे आणि प्रतिबंध या विषयावर भूमिका अभिनय सादर करण्यात आले.

सदर स्पर्धेचे परीक्षण संगीत शिक्षक राधेश्याम चौधरी व डी एड कॉलेज च्या अध्यापकाचार्य मीनाक्षी कटरे यांनी केले. लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय शाळा डव्वा ( ता. सडक अर्जुनी), द्वितीय क्रमांक शहीद जान्या तिम्या जि.प. हाय. गोरेगाव तर तृतीय क्रमांक अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय शाळा नंगपुरा/मुर्री (ता. गोंदिया) यांनी पटकावला. भूमिका अभिनय स्पर्धेत प्रथम क्रमांक अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय शाळा सरांडी (ता. तिरोडा), द्वितीय क्रमांक अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय शाळा डव्वा ( ता. सडक अर्जुनी) तर तृतीय क्रमांक शहीद जान्या तिम्या जि.प. हाय. गोरेगाव यांनी पटकावला. यातील प्रथम क्रमांकाची चमू दि. १७ ऑक्टोबर ला विभागस्तरावर होणाऱ्या विभागीय स्पर्धेत गोंदिया जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. विजयी चमुंना व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. नरेश वैद्य, विभाग प्रमुख पूनम घुले, अधिव्याख्याता डॉ. भाऊराव राठोड, परीक्षक राधेश्याम चौधरी व मीनाक्षी कटरे यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन शिक्षक सुनील हरिनखेडे तर आभार साधनव्यक्ती वशिष्ठ खोब्रागडे यांनी मानले. का