गोंदिया : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी परीक्षा घेतली जाणार आहे. उद्या, २१ फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात होणार आहे. यासाठी जिल्हयाच्या शिक्षण विभागाने परीक्षेचे पुर्ण तयारी केली आहे. गोंदिया जिल्ह्यातून १८ हजार ५९२ विद्यार्थी दहावीच्या परीक्षा देणार आहेत.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावीच्या परिक्षेला सुरूवात होणार आहे. यासाठी परिक्षा मंडळाच्या वतीने शिक्षण विभागाकडून कॉपीमुक्त वातावरणात परिक्षा घेण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यात दहावीच्या परिक्षेसाठी जिल्ह्यात ९८ केंद्र तयार करण्यात आलेअसून १८ हजार ५९२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
परीक्षा काळात विद्यार्थ्यांना येणारा ताण कमी करण्यासाठी व तणावमुक्त परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्याच्या सुचना शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शाळा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
दहावीचे परीक्षा केंद्र व विद्यार्थी
गोंदिया २९ केंद्र – ५६८६ विद्यार्थी
आमगाव-१० केंद्र- १८१३ विद्यार्थी
अर्जुनी मोरगाव – १० केंद्र – २३७१ विद्यार्थी
देवरी-९ केंद्र – १६१३ विद्यार्थी
गोरेगाव – १० केंद्र – १८५४ विद्यार्थी
सडक अर्जुनी – ८ केंद्र – १६०० विद्यार्थी
सालेकसा – ७ केंद्र – १२४० विद्यार्थी
तिरोडा – १४ केंद्र – २४१५ विद्यार्थी