देवरी: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दुपारी १२ वाजता नागपूरवरून ते देवरीसाठी रवाना होतील. दुपारी १:३० वाजता त्यांचे देवरी येथे आगमन होईल. यानंतर ते देवरी येथील क्रीडा मैदानावर आयोजित शिंदेसेनेचा मेळावा व पक्ष प्रवेश सोहळ्यास उपस्थित राहणार आहे. यानंतर दुपारी ३ वाजता ते देवरी येथून हेलिकाप्टरने कामठीसाठी रवाना होतील.