दामाजी पाटिल माध्य.आश्रमशाळेचे विद्यार्थी जळगावला रवाना

0
53

सडक अर्जुनी दिनांक 3 मे –लंजे शिक्षण संस्था द्वारा संचालित दामाजी पाटील  माध्यमिक आश्रम शाळा सडक अर्जुनी येथील विद्यार्थी जैन हिल्स संमेलनात सहभागी
FALI भारताच्या कृषी क्षेत्रातील भविष्याचे नायक या उपक्रमांतर्गत आमच्या शाळेत मागील काही वर्षापासून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने राबविले जात असून. या उपक्रमांतर्गत जळगाव येथे जैन हिल्स संमेलन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित केलेले आहे. या संमेलनाकरिता आमच्या शाळेतील विद्यार्थी सहभागी होण्याकरिता रवाना झालेले आहेत. तरी लंजे शिक्षण संस्था सौंदड फुटाळा चे सचिव अशोक  लंजे साहेब यांनी विद्यार्थ्यांना संमेलनात सहभागी होण्याकरिता शुभेच्छा दिल्या. तसेच आमच्या शाळेत शिक्षण घेत असलेले अतिदुर्गम भागातील विद्यार्थी असून त्यांना या उपक्रमांतर्गत नक्कीच फायदा होत आहे. असे आमचा निदर्शनास आले, तरी या विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व शिक्षक आमच्या शाळेचे मुख्याध्यापक के.के. पुस्तके यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या. सदर विद्यार्थ्यांसोबत आश्रम शाळेची शिक्षिका कुमारी जी .एम .गावल मॅडम सौ. श्रद्धा मॅडम, ह्या सुद्धा संमेलनात सहभागी होण्याकरिता रवाना झाल्या आहेत.